राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, आघाडीत सामील होणार?

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, आघाडीत सामील होणार?

नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राज यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींसोबत चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राज्यात आघाडीमध्ये काँग्रेस मनसेला घेणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान राज ठाकरे आज दिल्लीच्या दौय्रावर आहेत. आज सकाळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी निवडणुकीसाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही अशी टीकाही यावेळी राज ठाकरेंनी केली आहे.

COMMENTS