मनसे लोकसभेच्या तीन जागा लढवणार ?, राज ठाकरेंनी बोलावली बैठक !

मनसे लोकसभेच्या तीन जागा लढवणार ?, राज ठाकरेंनी बोलावली बैठक !

मुंबई  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये लोकसभेच्या किती जागा लढवायच्या आहेत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.

दरम्यान मनसे लोकसभा निवडणूक तीन जागांवर लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या तीन जागा नक्की कोणत्या हे अद्याप अस्पष्ट असून यामध्ये मुंबई आणि नाशिकच्या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे आमच्यासोबत येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनसेमध्ये आता हालचालींना वेग आला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS