राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंज-यात मुंबईचे महापौर, राज ठाकरेंचे शिवसेनेला फटकारे !

राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंज-यात मुंबईचे महापौर, राज ठाकरेंचे शिवसेनेला फटकारे !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी क व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रात त्यांनी शिवसेनेला फटकारे लगावले आहे. या व्यंगचित्रात राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दाखवण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली आहे. तर महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढले आहे.

COMMENTS