आजच्या शेवटच्या सभेत राज ठाकरे करणार मोठी पोलखोल !

आजच्या शेवटच्या सभेत राज ठाकरे करणार मोठी पोलखोल !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या शेवटच्या जाहीर सभेत  मोठी पोलखोल करणार असल्याची माहिती आहे. याबाबातचं ट्वीट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. आज नाशिकच्या सभेत पोलखोलचा ग्रँड फिनाले’, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आपल्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आम्ही सत्य दाखवून या मोदी सरकारची पोलखोल करत आहोत, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे.  राज ठाकरे यांची गुरुवारी पनवेलमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ स्टाईलचा वापर करत मोदींच्या प्रचारसभेत एका व्हायरल व्हिडिओची पोलखोल केली.

यावेळी मोदींची प्रचारसभा म्हणून व्हायरल होत असतानाचा व्हिडिओ चक्क दिवंगत भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयींच्या अंतयात्रेच्या वेळेचा असल्याचं भीषण वास्तव समोर आलं. तसंच मोदींनी गुजरातमधील दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ दाखवत राज यांनी पोलखोल त्यांची केली. त्यामुळे आजच्या सभेत ते आणखी काय पोलखोल करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS