आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्यावर पहिल्यांदाच राज ठाकरे म्हणाले …

आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्यावर पहिल्यांदाच राज ठाकरे म्हणाले …

मुंबई – ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?, जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय?असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिथे आघाडीने उमेदवार दिला असला, तरी मनसेने विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. ‘हे एक चांगलं कृत्य असून तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही असंही राज यांनी म्हटलं आहे.

COMMENTS