अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका – राज ठाकरे

अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका – राज ठाकरे

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेवू नका असं म्हटलं आहे, पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे जलसंधारण होऊ शकते तर मग इतक्या वर्षात जलसंधारणाचा पैसा कुठे मुरला? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी काही लोक बोलघेवड्यासारखे बोलतात त्यांना फक्त त्यावरच सभा जिंकून घ्यायची असते. अशी टीका राज ठाकरे यांच्यावर अजित पवार यांनी केली होती. तर याच कार्यक्रमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ऐवजी माणसे अडवा आणि त्यांची जिरवा हे धोरण राबवले गेले त्यामुळेच जलसंधारण होऊ शकले नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी आज अजित पवार यांना अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका. मी अजित दादांना उद्देशून बोललो नव्हतो., १९६० पासून जे घडते आहे त्याबद्दल बोललो होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.

COMMENTS