लॉकडाऊन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच, राज ठाकरेंचा इशारा!

लॉकडाऊन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच, राज ठाकरेंचा इशारा!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाउन पीळण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील. तसेच लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल. त्यामुळे लॉकडाऊन पाळा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. आता लॉकडाऊन आहे, नंतर आम्ही आहोतच, असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदींनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते, त्यांनी तसे काहीही केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाबाबत काय करायला पाहिजे हे सांगण्याची गरज होती. लोकांच्या मनातील संभ्रमावस्था पंतप्रधानांनी संपवायला हवी होती. त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला आहे.ज्यांना दिवे, मेणबत्त्या पेटवायच्या आहेत ते पेटवतील. मेणबत्या पेटवण्यापेक्षा त्यांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जीव धोक्यात घालून सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यांचे कौतुक आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

COMMENTS