राज ठाकरेंचा ठाणे दौरा, पदाधिका-यांची घेतली कार्यशाळा !

राज ठाकरेंचा ठाणे दौरा, पदाधिका-यांची घेतली कार्यशाळा !

मुंबई  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याच्या दौरा केला आहे. १ मे पासून महाराष्ट्र दौरा सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची  भेट घेतली आहे. आज त्यांनी पहिल्यांदाच मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली असून या कार्यशाळेत त्यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शनही केलं आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रात अशी पहिलीच कार्यशाळा झाली असून थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तसेच विविध शहरांमध्ये अशा कार्यशाळा  घेणार असल्याची माहिती आहे. ठाणे शहरात मनसेचे १२६ पदाधिकारी असून त्यांना लोकपयोगी कामं कशी करायची, जनसंपर्क कसा वाढवायचा अशा मुद्द्यांवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे राज यांच्या आगामी काळात होणा-या कार्यशाळेकडे सर्व पदाधिका-यांचं लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS