राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला पोलिसांचा रेड सिग्नल, परवागी नाकारली

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला पोलिसांचा रेड सिग्नल, परवागी नाकारली

ठाणे –  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 18 नोव्हेंबर रोजी ठाणे येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. मात्र ही सभा रस्त्यावर घेता येणार नाही,  हे कारण पुढे करीत पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे.

रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर मनमानी पद्धतीने कारवाई करत एक कोटी रुपयांची हमी पोलिसांनी मागितली आहे.

ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीजजवळील रस्त्यावर किंवा तलावपाळी मार्गावर राज यांच्या सभेचे आयोजन करण्यासाठी मनसेने परवानगी मागितली आहे. हा रस्ता रहदारीचा व शासकीय कार्यालयांना लागून असल्यामुळे परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे.

एल्फिस्टन दुर्घटनेचा जाब विचारण्यासाठी मनसेने याआधीही संताप मोर्चा काढला होता. 5 ऑक्टोबरला चर्चगेट येथील रेल्वे प्रशासकीय कार्यालयावर मनसेने काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

दरम्यान,  यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांना ठाण्यात सभेसाठी परवानगी देण्यात आली असताना आता मात्र मनसेला परवानगी नाकारल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

COMMENTS