राज ठाकरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

राज ठाकरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापलिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये प्रलंबित कामांची यादीच आयुक्तांपुढे मांडली. संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या समक्ष नगरसेवकांना दिलं.

अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले. त्यासाठी काही व्हाट्सअपचे मोबाईल फोन नंबर नागरिकांसाठी जाहीर करण्यात यावेत, या व्हाट्सअपवर नागरिकांना अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो देता येतील आणि महापालिकेला नियमित कारवाई करणं सोपं जाईल असे ठाकरे यांनी सुचवले. आयुक्तांना ही संकल्पना सुरु करण्याचं आश्वासन ठाकरेंना दिलं.

COMMENTS