पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन मोदी, शाहांना फटकारे, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन मोदी, शाहांना फटकारे, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई –  पेट्रोल आणि डिझेलची होत असलेल्या दरवाढीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढलं आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर राज यांनी चांगलेच फटकारे लगावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सामान्य नागरिकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरताना व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी दाखवलं आहे, तर अमित शहा त्यांच्या शेजारी पैसे घ्यायला थांबल्याचे दाखवले आहे. तसेच जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे असल्याचा संदेश राज ठाकरे यांनी दिला असून बाबांनो हेच का अच्छे दिन असं राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी देशात उच्चांक गाठला असून सध्या मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८२ तर प्रतिलिटर डिझेलचे दर ६९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला असून याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS