मेरे भाई और बहनो, राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांच्या मंचावर पहिल्यांदाच हिंदीतून भाषण !

मेरे भाई और बहनो, राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांच्या मंचावर पहिल्यांदाच हिंदीतून भाषण !

मुंबई – आजपर्यंत नेहमीच उत्तर भारतीयांवर जोरदार टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे नेहमीची मराठी भाषेचा मुद्दा उचलत उत्तर भारतीयांना राज्यातून पळवून लावण्याची भाषा करणा-या राज ठाकरे यांनी हिंदीतून भाषण केलं आहे.

दरम्यान आयोजकांनी आपल्याला हिंदीतून भाषण करण्याची विनंतरी केली होती. त्यामुळे आपण हिंदीतून भाषण करत असल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आयोजकांना माझ भाषण उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यात ऐकवायचं आहे. त्यामुळे त्यांनी मला विनंती केली असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा कधीच देण्यात आला नसल्याचंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच इतर प्रदेशातील इतर नागरिकांनाही माझं काय म्हणणं आहे हे समाजावं यासाठी मी पहिल्यांदाच हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS