‘त्या’ विधानामुळे नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही -राज ठाकरे

‘त्या’ विधानामुळे नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही -राज ठाकरे

मुंबई – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्टद्वारे म्हटलं आहे. आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हांला देश कधीही माफ करणार नाही’, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. मोदींच्या विधानावर राज ठाकरे यांनी टीका कोली आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरमार्फत मोदींवर टीका केली आहे.  तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS