पांडूरंगालाच तुमचं दर्शन नको असेल –राज ठाकरे

पांडूरंगालाच तुमचं दर्शन नको असेल –राज ठाकरे

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कदाचित पांडूरंगालच तुमचं दर्शन नको असेल, त्यामुळेच त्याने मला तुमचं दर्शन नकोय असे संकेत दिले असतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली असून थापा मारणारे मुख्यमंत्री असतील तर हे असंच होणार असल्याचंही यावेळी राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या इशा-यानंतर त्यांनी काल विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच आज आषाढीनिमित्त त्यांनी वर्षा बंगल्यावरच सहकुटुंब विठ्ठलाची पुजा केली. यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून विठ्ठलालाच तुमचं दर्शन नको असेल असं राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीवर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी मराठा समजाचं आंदोलन सुरु आहे. औरंगाबादमधील गंगापूरमध्ये काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे तर पाथर्डीमध्ये राज्य सरकारविरोधात भजन आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच अनेक ठिकाणी रास्तारोको देखील करण्यात आला आहे.

 

COMMENTS