गोवा, कर्नाटक, तेलंगणानंतर आता काँग्रेसमध्ये आणखी एका राज्यात फूट ?

गोवा, कर्नाटक, तेलंगणानंतर आता काँग्रेसमध्ये आणखी एका राज्यात फूट ?

नवी दिल्ली – गोवा, कर्नाटक, तेलंगणानंतर आता काँग्रेसमध्ये आणखी एका राज्यात फूट
पडली असल्याचं आहे. कारण राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे आमनेसामने आले आहेत.
या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण सुरु केलं आहे. जनतेने अशोक गहलोत यांच्या नावावर मत दिलं नाही, असा आरोप सचिन पायलट यांनी केला आहे, तर गहलोत यांनीही हाच आरोप सचिन पायलट यांच्यावर केल्याने राज्यातील काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अशोक गहलोत यांनी पायलट यांना थेट इशारा दिला आहे. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगू नये, असं गहलोत स्पष्टपणे म्हटलं आहे. विधानसभेत लोकांनी माझ्या नावावर मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान केलं. त्यामुळेच पक्षाने हे पद मला दिलं. दुसऱ्याच्या नावावर मतं मिळालेली नाहीत. जे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीतही नव्हते, ते आता स्वतःचं नाव पुढे ढकलत असल्याचंही गहलोत यांनी म्हटलं आहे. तसेच
राजस्थानचा बॉस मी स्वतःच आहे आणि असेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील आरोपांमुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS