राजस्थानमध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीसह “या” 4 पक्षांना सोडल्या आहेत जागा !

राजस्थानमध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीसह “या” 4 पक्षांना सोडल्या आहेत जागा !

जयपूर – राजस्थानमध्ये बसपासोबत आघाडी न करणा-या काँग्रेस पक्षानं इतर काही राजकीय पक्षांसोबत आघाडी केली आहे. त्यानुसार काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल आणि समाजवादी पार्टी यांच्यासोबत आघाडी केली आहे. या चार पक्षांना मिळून 6 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय लोकदल आणि लोकतांत्रिक जनता दल यांना प्रत्येकी 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसाठी प्रत्येकी 1 जागा सोडली आहे.

काँग्रेस 194 जांगवर लढणार आहे, तर मित्र पक्ष 6 जागांवर लढणार आहेत. त्यापैकी बहुतेक उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. भरतपूर आणि मालापूरा या दोन जागा राष्ट्रीय  लोकदलाच्या उमेदवारांसाठी दिल्या आहेत. बाली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. कुशालगड आणि मुंदवार या जागा शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनतादल या पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. तर आणखी एक जागा समाजवादी पार्टीसाठी सोडण्यात आली आहे.

COMMENTS