राजस्थान विधानसभा निवडणूक, वसुंधरा राजेंविरोधात काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी !

राजस्थान विधानसभा निवडणूक, वसुंधरा राजेंविरोधात काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी !

नवी दिल्ली – राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपा नेत्या व विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मोठं आव्हान दिलं आहे. काँग्रेसकडून वसुंधरा राजेंविरोधात थेट मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मानवेंद्र सिंह हे भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र असून  झालरापाटन या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून वसुंधरा राजे यादेखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट जसवंत सिंह यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे. झालावाड हा भाग वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS