कार अपघातात पंतप्रधान मोदींच्या पत्नी जखमी !

कार अपघातात पंतप्रधान मोदींच्या पत्नी जखमी !

राजस्थान – चित्तोडगड येथे झालेल्या कार अपघातात पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन या जखमी झाल्या आहेत. बेगू परिसरात काटूंदा वळणावर हा अपघात झाला असून अपघातानंतर जशोदा बेन यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्या जखमी झाल्या आहेत. तसेच त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जशोदाबेन या मेहसाना जिल्ह्यातील उंजा परिसरात आपले भाऊ अशोक यांच्यसोबत राहतात. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच त्यांना मेहसाना पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

COMMENTS