2019 मध्ये भाजप विरोधी पक्षातील सर्वात छोटा पक्ष असणार – राजू शेट्टी

2019 मध्ये भाजप विरोधी पक्षातील सर्वात छोटा पक्ष असणार – राजू शेट्टी

सातारा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप विरोधी पक्षात बसलेला सर्वात छोटा पक्ष दिसे असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते सातारा येथील एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच उसाच्या एफआरपीबाबत भाजपकडुन शेतक-यांची फसवणूक  करण्यात आली असल्याचा आरोपही यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे.

दरम्यान हिंदी चित्रटातील मुनीर प्रमाणे शेतक-यांना गोड बोलुन भाजपनं चुना लावला असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कमळ औषधालाही शिल्लक ठेवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कमळावर तण नाषक मारुन त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचं वक्तव्यही यावेळी राजू शेट्टी यांनी केलं आहे.

COMMENTS