महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा !

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा !

मुंबई – राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे.महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के नागरिकांना लाभ दिला जात होता. आता उर्वरित १५ टक्के लोकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचाही या योजनेंतर्गत समावेश करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई, पुण्यातील मोठ्या रुग्णालयांचे जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोशिएशनसोबत करार झाले आहेत. यामध्ये विविध आजाराच्या उपचारासाठी विविध पॅकेज ठरले असून रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करतांना जे दर निश्चित आहेत त्याप्रमाणेच आकारणी करायची आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी करत आहेत. यात मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या दर आकारणीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS