हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

मुंबई – हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता आहे.
कारण राजीव सातव हे गुजरातचे प्रभारी आहेत, गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार राजीनामे देऊन भाजपत जात आहेत. गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्याने सातव यांना गुजरातमध्ये काम करण्याची इच्छा असल्याची माहिती आहे.

दरम्यान हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचे याचा निर्णय सातव यांनी राहुल गांधींवर सोपवला आहे. त्यामुळे राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवणार का याबाबत चित्र अजूनही अस्पष्ट असून सातव यांनी हिंगोलीतून निवडणूक लढवली नाही तर याठिकाणी काँग्रेसची उमेदवारी कोणाला असलयणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS