प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या विधानसभेत खरंच राज ठाकरेंना गोल्डन चान्स आहे का ?

प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या विधानसभेत खरंच राज ठाकरेंना गोल्डन चान्स आहे का ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन लढवावी की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जावं याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या विचारमंथन सुरू आहे. आघाडी करुन लढवल्यास काय फायदे तोटे आहेत आणि स्वतंत्रपणे लढल्याच काय फायदे तोटे आहेत याबाबतचा अंदाज मनसेच  प्रमुख राज ठाकरे घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राज ठाकरे यांनी आघाडीसोबत जाऊ नये असा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी गोल्डन चान्स आहे. अशी संधी राज ठाकरेंच्या मनसेला पुन्हा येणार नाही असंही आंबेडकर म्हणाले आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती होत आहे. जवळापास त्यांच्यात 50-50 चा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. जर मित्र पक्ष भाजपाच्या चिन्हावर लढले तर जवळपास भाजप 153 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. यामधील अऩेक जागांवर शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदावार नसल्यामुळे त्याचा फायदा मनसेला होईल असंही आंबेडकर यांचं म्हणणं आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपाच्या लाटेत अनेकजण निवडूण आले होते. शिवसेनेची ताकद असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपचे आमदार निवडूण आले आहेत. उदाहरणच द्याचे झाले तर नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात भाजपाच्या मंदाताई म्हात्रे विजयी झाल्या आहेत. तशीची स्थिती ठाणे, कल्याण पश्चिम या मतदारसंघात आहे. या सर्व मतदारसंघात भलेही भाजपचे आमदार निवडूण आले असले तरी त्या ठिकाणी भाजपपेक्षा शिवसनेची ताकद मोठी आहे. जागावाटपात या जागा भाजपकडेच राहिल्या. तर अशा मतदारसंघात मनसेला संधी मिळू शकते. त्यामुळे आंबेडकरांच्या म्हणण्यात ब-यापैकी तथ्थ्य असल्याचं दिसून येतंय.

मनसेबाबत असं वक्तव्य करताना केवळ राज ठाकरे यांचा फायदा व्हावा असा उद्देश प्रकाश आंबेडकर यांचा असेल का ? तर याचा उत्तर नाही असंच आहे. यामध्ये राज ठाकरे यांचा निश्चित फायदा होऊ शकेलही. पण राज ठाकरे स्वबळावर निवडणुकीत उतरले भाजप शिवसेना यांच्या मतांमध्ये फाटाफूट होईल. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत राज न गेल्यामुळे तिथेही मतांची एकजूट होणार नाही. आणि त्याचा थेट फायदा वंचितच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या फायद्याचं गणित प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं असण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरे याच्यावर कशी प्रतिक्रिया देतात आणि काय निर्णय घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS