राज ठाकरे यांनी घेतली रामदास आठवले यांची भेट !

राज ठाकरे यांनी घेतली रामदास आठवले यांची भेट !

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे राज यांनी आठवलेंची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. ऐरवी राज ठाकरे आणि रामदास आठवले एकमेकांवर जाहिर सभांमधून जोरदार टीका करतात. मात्र अशा दुःखाच्या प्रसंगी राज यांनी आठवले यांची भेट घेऊन सांत्वन केलं. जवळपास अर्धा तास राज ठाकरे हे आठवलेंच्या घरी होते. राज यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत एकमेकांचे राजकीय वैरभाव नाही हे दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले.

COMMENTS