“मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत असं घडलं असतं तर त्याला जामीन दिला असता का ?”

“मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत असं घडलं असतं तर त्याला जामीन दिला असता का ?”

अहमदनगर –  मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या बाईकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला असून शेतकऱ्यांच्या बायका काय रस्त्यावर पडल्या आहेत का? असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान बुलडाण्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर राजेश हिवसेने पीककर्ज देण्यासाठी शेतक-याच्या पत्नीकडे शरिरसुखाची मागणी केली होती. त्यानंतर राजेश हिवसेला अटक करण्यात आली. परंतु न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देऊन एका दिवसात त्याला जामीन मंजूर केल्यामुळे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

एव्हढं हिन कृत्य करुनदेखील बँक अधिकाऱ्याला एका दिवसात जामिन मिळतोच कसा? देवेंद्र फडणवीस तुमच्या घरातल्या बाईकडे असं कोणी वाकड्या नजरेने बघितलं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? आमच्या शेतकऱ्याच्या बाया काय रस्त्यावर पडल्या आहेत का? तुमचं गृहखातं काय करतं? पुरावे असताना पोलिसांनी ही केस कोर्टासमोर सक्षमपणे मांडली नसल्याचंही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS