“राजू शेट्टींनी शेतक-यांची फसवणूक केली, यापुढे शेट्टींच्या आंदोलनावर विश्वास नाही !”

“राजू शेट्टींनी शेतक-यांची फसवणूक केली, यापुढे शेट्टींच्या आंदोलनावर विश्वास नाही !”

सांगली –  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि खासदार राजू शेट्टी यांनी शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शेट्टी यांनी उसाला एफआरपीनुसार एकरकमी दर देता येत नाही हे ज्ञात असतानाही आंदोलन मागे घेऊन ऊस उत्पादकांना फसवल्याचा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी  केला आहे. तसेच शेट्टी यांच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गाची फसवणूक झाली असल्यामुळे शेट्टींच्या आंदोलनावर विश्वास उरलेला नसल्याचंही कोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजू शेट्टी यांनी आतापर्यंत दूध, भात आणि ऊसाच्या दरांसाठीच आंदोलने केले असून ही आंदोलनं करीत असताना दूध डेअरी आणि भात गिरणी सुरू केली. आता ते साखर कारखाना काढण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही संजय कोले यांनी केला आहे.

तसेच साखरेचे मूल्यांकन पाहून बँकाकडून उचल मिळते. यावर आधारित पहिला हप्ता कारखान्याकडून ऊस उत्पादकांना मिळतो. यंदा बाजारातील साखरेचे दर तीन हजारांच्या घरात आहेत. यावर ८५ ते ९० टक्के उचल मिळते. वाहतूक आणि गाळप यांचा खर्च धरला तर एफआरपीनुसार दर देण्यासाठी टनाला ४०० ते ५०० रुपये कमी पडतात हे वास्तव असताना २० दिवस आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काय साध्य केले? असा सवालही संजय कोले यांनी केला आहे.

COMMENTS