सतेज पाटलांच्या विनंतीनंतर राजू शेट्टींचा काँग्रेसला आणखी दोन दिवसाचा अल्टीमेटम!

सतेज पाटलांच्या विनंतीनंतर राजू शेट्टींचा काँग्रेसला आणखी दोन दिवसाचा अल्टीमेटम!

सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे. सांगली अथवा अन्य दुसरा मतदारसंघ मिळण्याबाबत दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी एकाकी लढणार असून स्वाभिमानीकडे तीन सक्षम उमेदवार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांच्या विंनतीवरून, खासदार राजू शेट्टी यांनी आणखीन दोन दिवसांची काँग्रेसला मुदत दिली आहे.

आम्ही योग्यवेळी ते उमेदवारी जाहीर करू. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. कॉंग्रेसने बुलढाणा आणि शिर्डीची जागा बदलून द्यावी. मात्र वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका, असे म्हणत खासदार राजू शेट्टीनी काँग्रेस हायकमंडकडे हा तिढा सोडवण्याची विनंती केली होती. परंतु तरीही काँग्रेसनं निर्णय घेतला नसल्यामुळे आज पुन्हा काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी दोन दिवसाची मागितली मुदत मागितल्यानंतर शेट्टी यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे.

COMMENTS