‘हे’ न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं, राजू शेट्टींचं सचिन तेंडूलकरबाबत वादग्रस्त वक्तव्य !

‘हे’ न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं, राजू शेट्टींचं सचिन तेंडूलकरबाबत वादग्रस्त वक्तव्य !

सातारा – सचिनने किती धावा काढल्या व किती मॅचफिक्सींग केलं हे न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं, असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं असल्याची माहिती आहे. याबाबतची बातमी लोकसत्तानं दिली असून शेट्टी यांनी काल  यशवंत सातारा संघाचा एक कार्यक्रम होता . हा कार्यक्रम साताऱ्यातील गोळेश्वर या गावी पार पडला.  त्या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान “खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यात केंद्र व राज्य सरकार कमी पडले. भलत्या, सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्‍सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. खाशाबा हे सचिनपेक्षा तसूभरही कमी नव्हते. मात्र केवळ खेड्यातून असल्यामुळे खाशाबांवर अन्याय झाला का सामन्य जनतेच्या मनात प्रश्न असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

तसेच खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचं यावेळी राजू शेट्टींनी म्हटलं. काँग्रेसच्या काळात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी दोन ओळीच्या पत्रात सांगितले की, हयात नसणाऱ्या व्यक्तीस असला पुरस्कार दिला जात नाही. शासन दरबारी खाशाबा जाधवांच्या सन्मानासाठी लढाई सुरु ठेवणार असल्याचंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS