शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील बैठक संपली, या विषयावर केली चर्चा !

शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील बैठक संपली, या विषयावर केली चर्चा !

मुंबई – ऱाष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये आज बैठक पार पडली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी पवारांची भेट घेऊन ३० नोव्हेंबरला दिल्लीमध्ये होणाऱ्या संसद घेराव आंदोलनाबाबत चर्चा केली आहे. तसेच शरद पवार यांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं असल्याचं खासदार राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी शरद पवार स्वतः रस घेवून विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सपर्क करत असल्याचंही यावेळी शेट्टी यांनी म्हटलं आहे. देशातील एकूण २२ पक्षांनी दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच मी शेतक-यांशी बांधील असून माझी वैयक्तिक कोणतीही भूमिका नाही. संपूर्ण कर्जमाफी आणि दिडपट हमीभाव मिळत असेल तर आम्ही आघाडीत जावू असंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS