उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय का?, भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले…

उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय का?, भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले…

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची आज स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच उदयनराजे यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,’ अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

दरम्यान उदयनराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर आज स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी विनंती केली असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उदयनराजे आता काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS