राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, स्वाभिमानीतील वाद मिटला!

राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, स्वाभिमानीतील वाद मिटला!

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला असून राजू शेट्टी यांनी घेतलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांची नाराजी दूर झाली आहे.कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधान परिषदेत जाणार आहेत.

दरम्यान राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित झाल्यावर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तील काही नेते नाराज झाले होते. यानंतर राजू शेट्टी यांनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय घेतला होता. अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच” अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली होती. परंतु त्यानंतर आज झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.

COMMENTS