…तर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही धक्का बसणार, राज ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये ‘अशीही’ चर्चा ?

…तर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही धक्का बसणार, राज ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये ‘अशीही’ चर्चा ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन त्यांनी भेट घेतली आहे.
या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. ती म्हणजे राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज ठाकरे यांची मनसे हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.

Posted by अमोल बोडरे on Thursday, July 4, 2019

दरम्यान राजू शेट्टी यांनी बुधवारी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच ही निवडणूक महाआघाडीतून की स्वबळावर लढवायची याबाबत ऑगस्ट महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. असं शेट्टी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राजू शेट्टी यांना आघाडीने 49 जागा सोडल्या नाही तर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. जर आघाडीने आपला प्रस्ताव मान्य केला नाही तर मनसेला सोबत घेऊन राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवतूल असा अंदाज मांडला जात आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीप्राणेच विधानसभा निवडणुकीतही मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक विचार करत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत सामील झाले नाही तर हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असा अंदाज मांडला जात आहे.

तसेच आजच्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी “राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व भाजपाविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसचासुद्धा विरोध मावळेल असं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेनंतरच हे चित्र स्पष्ट होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS