काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांना मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही – राजू शेट्टी

काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांना मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही – राजू शेट्टी

पुणे – काँग्रेस-राष्ट्रवादीला मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. तसेच भाजपसोबत आम्ही होतो. त्यांनी आम्हाला गंडवलं. आमच्यासारख्या पक्षाचे लचके तोडले. तसेच ज्या पद्धतीनं भाजप-शिवसेना सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांच्याविरूद्ध लढायचं असेल, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येवून लढलं पाहिजे. त्यासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवाजी महाराजांनी सांगितलंय, मुघलांशी लढायचं असेल तर कुतुबशाही- आदिलशाहीशी हात मिळवणी करावी लागेल. त्याच न्यायानं आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो आहोत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आदिलशहाला चांगलं असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं का असा सवालही त्यांनी केला आहे.

COMMENTS