मंत्रिमंडळ विस्तारावर घटकपक्ष नाराज, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत!  VIDEO

मंत्रिमंडळ विस्तारावर घटकपक्ष नाराज, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत! VIDEO

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या विस्तारावर घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत राजी शेट्टी यांनी ट्वीट केलं आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार स्थापन होतानाच मित्र पक्षांना आवश्यक तो मानसन्मान देण्याचा शब्द तिन्ही प्रमुख पक्षांकडून देण्यात आला होता. त्यामुळं मित्र पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असं सांगितलं जात होतं. मात्र, तसं झालेलं नाही. शेकाप, स्वाभिमानी, समाजवादी पक्ष, लोकभारती यापैकी कुठल्याही पक्षाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही.

त्यामुळं मित्र पक्षांमध्ये नाराजी आहे. राजू शेट्टी यांना साधं शपथविधी सोहळ्याचं आमंत्रणही देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे ते या विस्ताराला उपस्थिती राहिले नाहीत. ‘सरकार स्थापन होईपर्यंत आम्हाला विचारात घेतलं जात होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर मित्रांचा विसर पडला, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.

COMMENTS