मोदींना पुन्हा चहाच विकावा लागेल – राजू शेट्टी

मोदींना पुन्हा चहाच विकावा लागेल – राजू शेट्टी

नंदुरबार- शेतक-यांचा सातबारा कोरा आणि दिडपट हमीभाव दिला नाही, तर शेतकरी पुन्हा मोदींना चहा विकायला लावतील, अशी सडकून टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते हिंगणी जि. नंदूरबार येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून सुरु झालेली शेतकरी सन्मान यात्रा आज नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी हिंगणी येथे स्वाभिमानीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खा. राजू शेट्टी म्हणाले, मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाली, शेतक-यांसाठी नवीन काय केले. केवळ दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली. जे विरोधात असताना शेतक-यांच्या बाजूने गळे काढायचे तेच आता शेतक-यांना लुटत आहेत. शेतकरी आत्महत्येवर मोदी सरकारचं मौन आहे.त्यांना याबद्दल काहीच देणेघेणे नाही. शेतक-यांचे शोषण करणारी ही भांडवली व्यवस्थाच निर्माण झाली आहे. याचे पाळेमुळे उखडून टाकायचे असतील तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल असंही शेट्टी यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS