सदाभाऊ हा किरकोळ माणूस – राजू शेट्टी

सदाभाऊ हा किरकोळ माणूस – राजू शेट्टी

सांगली – वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ पण आमचा जो अधिकारी आहे तो आम्ही मिळवणारच असल्याचं वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडलं असून 11 तारखे नंतर एक दिवसाचा बंद पुकारला जाणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. मागील पैसे न देणारे आणि एफ आरपी न दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नका असे न्यायालयाने आदेश दिलेत, मात्र तरी अशा कारखान्यांना पोलीस संरक्षण कसे दिले जाते असा सवालही खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच एफआरपी अधिक दोनशे रुपये हे द्यावेच लागतील, जर हे न करता कारखाने सुरू केले तर, त्या कारखान्यांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचही  राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते सांगलीतील एका कार्यक्रमता बोलत होते.

आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ऊस कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही. साखर कारखानदार काही बोलत नाही. अनेक कारखाने सुरु आहेत. जबरदस्तीने ऊस शेतकऱ्यांकडून मागवला जात आहे. त्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांना नोटीस पाठवली असल्याचंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आत्ताच्या सरकारला रक्तपात पाहिजे. हिंसा निर्माण करण्याच्या प्रवृत्तीची मानस सरकारमध्ये बसली आहे. उसदर आंदोलन मोडून काढण्याचा डाव सुरू आहे.  तसेच सदाभाऊ हा किरकोळ माणूस, पण जे महसूलमंत्री चंद्रकांत दादापाटील यांनी मागील वेळेस श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता, मग पाटील हे ह्या वेळी काय करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कायदे सक्षम आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करणारे नेते भ्रष्ट आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहेत. राजकीय भूमिका वेगळी मात्र, ऊसदर आंदोलनाबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. कोण्हीही असो आम्ही त्याला सोडणार नाही. पूर्वीचे मुख्यमंत्री आणि सरकार दिल्लीत जाऊन ऊसाबाबत निर्णय घेत होते. मात्र आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचं दिल्लीत वजन दिसत नाही, ते तसे प्रयत्न पण करत नसल्याचा आरोपही यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

COMMENTS