दूध दरासाठीचं आंदोलन मागे नाही, लिटरमागे शेतक-याला पाच रुपये द्या – राजू शेट्टी

मुंबई – राज्यातील दुध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं निर्णय घेतला असून याबाबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज विधीमंडळात निवेदन दिलं आहे. दुध भुकटी निर्यात करणार्‍या दुध संघांना प्रति किलो 50 रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. तसेच जे दूध प्रकल्प दूध निर्यात करतील त्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार असून शालेय पोषण आहारात दुध किंवा दुध भुकटी देणार असल्याची माहितीही जानकर यांनी दिली आहे. तसेच दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीत सवलत देण्याची केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याची माहितीही जानकर यांनी दिली आहे.

दरम्यान सरकारनं केलेल्या या घोषणेनंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दूध दरासाठीचं आंदोलन मागे घेणार नसून लिटरमागे शेतक-याला पाच रुपये द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी धरुन ठेवली आहे. त्यामुळे दूध दरवाढीसाठी शेतक-यांचं आंदोलन होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS