यापुढे मडकी पारखून घेणार, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला !

यापुढे मडकी पारखून घेणार, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला !

औरंगाबाद – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला आहे. सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतांना आम्ही सर्व मडक्यांना सारखाच आकार दिला होता. पण सदाभाऊ खोत यांच्च मडकं कच्चं निघालं. यापुढे मडकी पारखून घेणार, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून राजू शेट्टी यांनी आघाडीला हात दिला होता. या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला.परंतु लोकसभा निवडणुकीत भजपची साथ सोडल्याचा अजिबात पश्चाताप नसल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीसोबत गेल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘आली बाबा चाळीस चोर’ असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा प्रश्‍नही त्यांनी पस्थित केला होता.

त्यानंतर आज राजू शेट्टी यांनी एकेकाळचे जवळचे सहकारी असलेले सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतांना आम्ही सर्व मडक्यांना सारखाच आकार दिला होता. पण सदाभाऊ खोत यांच्च मडकं कच्चं निघालं. यापुढे मडकी पारखून घेणार, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

COMMENTS