सदाभाऊंचा राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानीच्या ‘या’ नेत्यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश!

सदाभाऊंचा राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानीच्या ‘या’ नेत्यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टटी यांना धक्का बसला आहे. स्वाभिमानीच्या अनेक पदाधिकाय्रांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. यात स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांचा देखील समावेश आहे.यामध्ये राज्य कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष यांनी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान स्वाभिमानीतील अंतर्गत दबाव, जातीयवाद अशा गोष्टींना कंटाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.

यांनी केला रयत क्रांती संघटनेत प्रवेश

राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार

जिल्हा उपाध्यक्ष डोंगर आण्णा पवार

जिल्हा संघटक भिकाबापु धोंडगे

जिल्हा संघटक केरादादा पगार

जिल्हा संघटक साहेबराव पाटील (अहिरे)

जिल्हा संघटक संदीप कापडणीस

जिल्हा संघटक रवींद्र पगार

कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव

सटाणा तालुका अध्यक्ष सुभाष अहिरे

देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे

युवा उपाध्यक्ष पंडरिनाथ अहिरे

तालुका युवा उपाध्यक्ष भाऊसाहेब पगार

तालुका युवा अध्यक्ष युवराज देवरे

COMMENTS