वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी ?

वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी ?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापदीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृणमूल काँग्रेसने राज्यसभा उपसभापतीपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याबाबत अधिवेशनापूर्वी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज असून भाज 69 जागांसाठी सभागृहात सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही एनडीएचा आकडा बहूमतापासून दूर आहे. त्यामुळे काही मित्रपक्ष आणि काही अपक्षांशी तडजोड केली तर भाजपचा 115 पर्यंत आकडा जाऊ शकतो, परंतु 13 खासदार असलेल्या एमआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित झालं नाही. त्यामुळे एमआयडीएमकेने जर विरोधकांशी हातमिळवणी केली तर वंदना चव्हाण या राज्यसभा उपसभापतीपदावर विराजमान होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी हालचालींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS