आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘हे’ नाव फिक्स !

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘हे’ नाव फिक्स !

नवी दिल्ली – राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक आयोगानं शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. देशभरातून 58 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तर महाराष्ट्रातील 6 जगांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार असून विविध पक्षातील हे सहा खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी, कॉंग्रेसकडून रजनी पाटील, राजीव शुक्ला, शिवसेनेकडून अनिल देसाई, आणि भाजपकडून अजयकुमार संचेती यांचा कार्यकाळ संपत आला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या सहा उमेदवारांच्या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु निवडणुकीची घोषणा होताच शिवसेनेनं मात्र आपल्या उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देसाईंचं नाव शिवसेनेनं कायम ठेवलं आहे. त्यामुळे देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरे यांनीच केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेचा सध्याचा उमेदवार समोर  आल्याने आता इतर राजकीय पक्ष कोणत्या उमेदवाराला संधी देतात याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS