राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा पाठिंबा जाहीर !

राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा पाठिंबा जाहीर !

नवी दिल्ली – राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. परंतु शिवसेनेने अखेर आपला पाठिंबा जाहीर केला असून नितीश कुमार यांच्या जेडीयूला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे आणि नितीशकुमार यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाली. त्यानंतर आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत-नितीशकुमार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर शिवसेनेनं आपला पाठिंबा जेडीयूला देण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपप्रणीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चा उमेदवार म्हणून जनता दल (संयुक्त) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. परंतु एनडीएच्या साथीदारांचं संख्याबळ पूर्णपणे हरिवंश यांच्या पाठिशी उभं राहिल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

COMMENTS