राज्यसभा पोटनिवडणूक निकाल, काँग्रेसला बंडखोरीचा फटका!

राज्यसभा पोटनिवडणूक निकाल, काँग्रेसला बंडखोरीचा फटका!

नवी दिल्ली – गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली असून भाजपचे उमेदवार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. के. जयशंकर आणि उत्तर गुजरातच्या ओबीसी सेलचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने दोन्ही जागांसाठी उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या काही आमदारांनी या निवडणुकीसाठी क्रॉस मतदान केले.

दरम्यान भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृति इराणी यांच्या रिक्त झालेल्या दोन राज्यसभेच्या जागांवर काल मतदान घेण्यात आले होते. या दोन्ही जागा राखण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपचे उमेदवार एस. जयशंकर यांना १०४ मिळाली तर जुगलकिशोर ठाकोर यांना १०५ मते मिळाली. त्याच वेळी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना ७०-७० मते मिळाली.काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील ज्येष्ठ नेते चंद्रिका चुदासमा आणि गौरव पंड्या यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र, त्यांना मतदान फुटीचा फटका बसला. त्यामुळे ते अपेक्षीत मते घेऊ शकलेले नाहीत.या निवडणुकीला काँग्रेसकडून हरकत घेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल उशिरा घोषित करण्यात आला.

COMMENTS