राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर, १९ जून रोजी पार पडणार मतदान !

राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर, १९ जून रोजी पार पडणार मतदान !

नवी दिल्ली – कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यसभेच्या १८ जागांसीठीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून रोजी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या १८ जागांपैकी गुजरात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी चार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन आणि मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे.

दरम्यान कोरोना संकटामुळे २६ मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचना विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगास करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काल अखेर निवडणूक आयोगान या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून येत्या १९ जून रोजी मतदान पार पडणार आहे.

COMMENTS