भाजपकडून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार तर आघाडीच्या चार पैकी 2 जागांसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न?

भाजपकडून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार तर आघाडीच्या चार पैकी 2 जागांसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न?

मुंबई – भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर संधी देऊन केंद्रात पाठवण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सरकार नसल्यास फडणवीसांचा केंद्र सरकारमध्ये उपयोग करून घ्यावा अशी श्रेष्ठींची इच्छा असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. राज्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या सात सदस्यांमध्ये भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे चार असे उमेदवार सहज निवडून येतील अशी स्थिती आहे.

दरम्यान आघाडीच्या चारपैकी 2 जागांसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असल्याची माहिती आहे. शिवसेनेशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती असून एका जागेवर शरद पवारांचं नाव निश्चित आहे तर दुसरी जागा मिळाल्यास माजिद मेनन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आगामी भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS