राम कदम यांचा दहीहंडीचा कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना करणार मदत!

राम कदम यांचा दहीहंडीचा कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना करणार मदत!

मुंबई – कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राम कदम यांनी दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले असून शक्य असेल तेवढी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान मागील वर्षी राम कदम यांनी आयोजित केलेला दहीहंडीचा सोहळा चांगलाच गाजला होता. मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती.राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. तसेच राज्य महिला आयोगाने कदम यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना नोटीस बजावून आठ दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. परंतु यावर्षी मात्र राम कदम यांनी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करुन पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत मिळणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS