रामदास आठवलेंनी घेतली कंगना रणौतची भेट, कंगनाला दिली थेट ऑफर, पाहा व्हि़डीओ !

रामदास आठवलेंनी घेतली कंगना रणौतची भेट, कंगनाला दिली थेट ऑफर, पाहा व्हि़डीओ !

मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आठवले यांनी कंगनाला थेट ऑफर दिली आहे. कंगनाने भाजप किंवा आरपीआयमध्ये प्रवेश केल्यास तिचं स्वागत आहे असं आठवले यांनी म्हटलं आहे. आपल्याला राजकारणात प्रवेश करायचा नाही आणि आवडही नाही असं कंगनाने सांगितलं आहे. मात्र तिची इच्छा असेल तर तिचं भाजप किंवा आरपीआयमध्ये स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी चित्रपटात ती दलीत मुलीची भूमिका करणार असून जमेल तेवढं चित्रपटात काम करायचं आहे असं कंगनाने सांगितलं आहे. तिला समाजात एकता निर्माण करायची आहे असंही तिने म्हटलं असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS