वंचित आघाडी नसून किंचित आघाडी आहे – रामदास आठवले

वंचित आघाडी नसून किंचित आघाडी आहे – रामदास आठवले

पुणे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीवर टीका केली आहे. ही वंचित आघाडी नसून किंचित आघाडी असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. दहा वर्षांनी एकदा नोटबंदी करावी. अन्यथा देशात काळा पैसा वाढेल. असं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन ठेवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शोधनिबंधाचा आधार घेऊनच नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटबंदी योग्यच असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते बारामती येथे महायुतीच्या सभेत बोलत होते.

दरम्यान आगामी ननिवडणुकीत भाजप 282 चा आकडा पार करेल. तर एनडीए 350 चा आखडा पार करेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद मिटला असून इतरांचे ही वाद मिटले मात्र, माझा आणि प्रकाश आंबेडकरांचा वाद काही मिटत नाही असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच बारामतीची जागा महादेव थोड्या फरकाने हारले होते. त्यांनी कपबशी चिन्हं घेतलं होतं. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर, विजयी झाले असते. यावेळी मात्र बारामतीत इतिहास घडणार आहे. काचंन कुल यावेळी बारामतीची जागा खेचून आणतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

वंचित आघाडी नसुन किंचित आघाडी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परीणाम करणारी ही आघाडी आहे. महाराष्ट्राची जनता तिसय्रा आघाडीला साथ देत नाही. मात्र वंचित आघाडीला मिळणाय्रा मतांचा फायदा भाजप – सेना युतीला होणार आहे.प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी असही, तसेच सत्तेत यायचे असेल तर, वंचित आघाडीने एनडीएमध्ये यावे असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट चागलं असतं. त्यामुळे त्यांच्या सभा मोठ्या होतात. पण त्यांच्या सभांचा फारसा परिणाम आमच्यावर होणार नाही. राज ठाकरे तेच तेच मुद्दे मांडतात असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तर नरेंद्र मोदी फकीर आदमी है. राहुल गांधी को भी भविष्य मे अच्छा होना है तो उन्हे फकीर बनना पडेगा. और उनको जल्दी से जल्दी शादी करणी पडेगी असा टोलाही यावेळी रामदास आठवले यांनी लगावला आहे.

मी मंत्री होतो म्हणून मला बंद पुकारता आला नाही. अन्यथा कोरेगाव भिमा नंतर प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारण्याआधी मी बंद पुकारला असता. मात्र आंबेडकरांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यास मी कार्यकर्त्यांना सांगितले होते असं स्पष्टीकरणही रामदास आठवले यांनी दिलं आहे.

पाकिस्तानमध्ये 11 व्या शतकात इस्लाम आला. मात्र त्याआधी पाकिस्तानमध्ये बुद्धीसम होता. त्यामुळे पाकिस्तान आपलाच आहे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानने सोडून द्यावा किंवा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा असंही आठवले म्हणालेत. तसेच शिवसेना-भाजपची झाली युती. जरी आमची झाली माती. तरी हे दोघेच घेणार सत्ता हाती अशी कविताही यावेळी आठवले यांनी म्हटली आहे.

COMMENTS