एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आज रामदास आठवलेंचं शक्तिप्रदर्शन !

एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आज रामदास आठवलेंचं शक्तिप्रदर्शन !

मुंबई – एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आज रामदास आठवलेंचं शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साजरा होत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिन सोहळ्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. पक्षाचा आज 61 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त होत असलेल्या शक्तिप्रदर्शनाला पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते-मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात हायलँड पार्क ग्राउंड सायंकाळी वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक तसंच भारिप-एमआयएम या राजकीय पक्षांमध्ये झालेली युती या पार्श्वभूमीवर फडणवीस-आठवले काय भूमिका मांडतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तसेच मागच्या निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांना दलित मतं टिकवून ठेवण्यात यश आलं होतं. यावेळेसही दलित मतं टिकवून ठेवण्यासाठी आठवले आणि भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला 2014 प्रमाणेच गर्दी होते का नाही हे पाहणं गरजेचं आहे. तसेच आजच्या या गर्दीवरुन भाजप आणि आठवलेंच्या ताकदीचा अंदाज लावला जाणार आहे.

 

COMMENTS