“मोदी आयपीएल टीमचे कॅप्टन, मी चांगला बॅट्समन !”

“मोदी आयपीएल टीमचे कॅप्टन, मी चांगला बॅट्समन !”

पुणे – रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य व्हायला पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची आमची तयारी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकर हे आमचे सन्माननीय नेते असून ते बाबसाहेबांचे नातू आहेत माझं त्यांच्याशी पटतं, पण त्यांचं माझ्याशी पटत नसल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. भाजपची शिवसेनेसोबत युती आवश्यक आहे. युती न होणं हे स्व. बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरुद्ध असून यासंदर्भात पंतप्रधानांशी देखील बोललो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा तसेच ऍट्रोसिटी कायद्याला कुठलाच धक्का लागू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच संभाजी भिडे यांच्याबाबत सखोल तपास करावा, ते दोषी असतील त्यांना अटक करावी या मागण्यांसाठी २ मे ला जिल्हास्तरावर मोर्चे काढणार असल्याचंही आठवले यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान २०१९ मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार येणार असून राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केलं तरी ते पंतप्रधान होणार नाहीत असंही आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच  मोदी आयपीएल टीमचे कॅप्टन आहेत तर मी चांगला बॅट्समन आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझा प्रस्ताव स्वीकारल्यास कुठे जायचे ते ठरवू असंही ते म्हणाले आहेत. तसेच एकजुट झाल्यास ते अध्यक्ष असतील मी कार्याध्यक्ष असेल आणि जे समाजाच्या फायद्याचे असेल ते करू असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS