…तर आम्ही त्यांना गाडून टाकू, रामदास कदमांचा भाजपला इशारा !

…तर आम्ही त्यांना गाडून टाकू, रामदास कदमांचा भाजपला इशारा !

मुंबई   शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला इशारा दिला आहे. महाराष्ट्रात येऊन कुणी शिवसेनेला आव्हान देऊ नये, असं झालं तर आम्ही त्यांना गाडून टाकू असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच मोदींची लाट असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे 63 आमदार निवडून आलेत. आता तर त्यांचं काहीच नाही असा टोला देखील रामदास कदम यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान लातूर येथील सभेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली होती. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको ‘पटक’ देंगे  असं शाह यांनी म्हटलं होतं. तसेच कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपला अखेर रामदास कदम यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी वाढत चालला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS